
दिनांक 24 मार्च ते 27 मार्च रोजी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धे करिता आपल्या संस्थेतील खेळाडू कु. पार्थ मायनाक ( किशोर गट) , कु. जानवी थोरवे ( किशोरी गट) , कु. सानिया मोरे ( महिला गट), आणि कु. शुभम जाधव ( पुरुष गट) ह्यांची ठाणे जिल्हा संघात निवड झाली तसेच संस्थेचे खो खो प्रशिक्षक प्रणय कमले ह्यांची ठाणे जिल्हा किशोर संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली त्याकरिता संस्थेचे अध्यक्ष आणि सभासदतर्फे खेळाडूंचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस सुभेच्छा

दिनांक १७ मे व १८ मे २०२५ रोजी श्री आनंद भारती समाज आयोजित आनंद भारती खो खो लीग (ABKL) ह्या स्पर्धे मध्ये आपल्या संस्थेतील खो खो खेळाडू कु. मनीष निमकर ह्यास स्पर्धेतील उत्कृष्ट आक्रमक हा पुरस्कार देण्यात आला. मनीष ने संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल १७ खेळाडू बाद केले.
आणि सर्वांचा लाडका कु. देवेश देशमुख ह्याने ह्याच स्पर्धेत सलग दोन वर्षे स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू हा पुरस्कार प्राप्त केला . देवेशने ह्या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करीत १३.५० मिनिटे संरक्षण करीत एकूण १७ खेळाडू बाद केले.
संस्थेकडून दोन्ही खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस सुभेच्छा

श्री मावळी मंडळ ठाणे आयोजित १०० व्या शिवजयंती उत्सव निमित्त ७२ व्या राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेचा अंतिम विजेता संघ (पुरुष) स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर)

श्री मावळी मंडळ ठाणे आयोजित १०० व्या शिवजयंती उत्सव निमित्त ७२ व्या राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेचा अंतिम विजेता संघ (महिला) डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर)